Friends (2016)
0/10
Vote : 0
फ्रेंड्स ()
StoryLine
‘फ्रेंड्स‘ची कथा आहे नील (स्वप्नील जोशी) या कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या तरुणाची. बड्या राजकीय नेत्याचा हा मुलगा शिक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल होतो. कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवर नीलला भैरवी (गौरी नलावडे) भेटते व तो पहिल्याच भेटीच तिच्या प्रेमात पडलेला असतो. ही गोष्ट नीलचा मित्र रघू (सागर कारंडे) याला माहीत असते, मात्र भैरवीबद्दलची कोणतीही माहिती दोघांकडं नसते. मुंबईत आल्यावर नीलची कॉलेजमधील हिरो करण (सचित पाटील) याच्याशी प्रथम दुश्मनी व नंतर छान दोस्ती होते. करणच्या घरामध्ये अशी काही घटना घडलेली असते, ज्यामुळं तो कोणत्याही मित्राला घरी आणत नसतो. मात्र, नीलला तो आपल्या घरात घेऊन येतो. भैरवी करणचीच बहीण असल्याचं नीलला समजतं. नील तिचा पाठलाग करीत राहतो आणि आपलं प्रेम व्यक्तही करतो.